उद्या बाजार समिती सभापती पदाची निवड
यावल ( प्रतिनिधी ) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक १८ मे रोजी, निवडणूक निर्णय अधिकारी पी. एफ .चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली होत आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप शिवसेना (शिंदे गटाला) बहुमत मिळाले आहे. सभापतीपदासाठी भाजपाकडून इच्छुक असलेल्या उमेदवार निश्चितीसाठी बुधवारी तालुका कोअर कमिटीची बैठक होत असून सभापती उमेदवार च्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सभापतीपदासाठी भाजपाचे सुमारे पाच उमेदवार इच्छुक आहेत यापैकी कोणाचे नाव निच्छीत होते अथवा विभागून दिल्या जाते की काय याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागून आहे .
येथील बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १५ उमेदवार भाजप सेना (शिंदे गटाचे) निवडून आले आहेत, त्यापैकी भाजपाने १३ तर शिंदे गटाचे दोन संचालक निवडून आले आहेत सभापती पद भाजपाकडे तर उपसभापती पद शिंदे गटाकडे जाणार असल्याचे महायुतीचे ठरले आहे .सभापतीपदासाठी संचालक राकेश फेगडे, माजी जि. प. सदस्य हर्षल पाटील , नारायण शशीकांत चौधरी , उमेश पाटील आणी उज्जैनसिंग राजपुत हे सभापती पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. सभापतीपदाची एकमताने निवड व्हावी यासाठी बुधवारी तालुका भाजपाच्या कोअर समितीची बैठक होत असून बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे तालुका वाशियाचे लक्ष लागून आहे .