आरोग्य व शिक्षणरावेर

बलवाडी येथे घरोघरी जाऊन डेंग्यू , चिकन गुनिया, व मलेरिया या आजारां विषयी जनजागृती

डेंग्यू ला प्रतिबंध करूया ,सुरुवात घरापासून करूया

बलवाड़ी प्रतिनिधी:–आशीष चौधरी

बलवाडी ता.रावेर येथे जागतिक डेंग्यू डे निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र निंभोरा बु.अंतर्गत आरोग्य उपकेंद्र बलवाडी गावा मध्ये घरोघरी जाऊन डेंग्यू , चिकांगुनिया, व मलेरिया या आजारां विषयी जनजागृती करून चौकाचौकात जाऊन माहिती पत्रक वाटप करण्यात आले व आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा या बाबत सांगण्यात आले .गावात जनजागृती करतांना व कंटेनर सर्वेक्षण करून कीटकजन्य आजार प्रतिबंधक उपाय योजने बाबत मार्गदर्शन डॉ.श्री.महेंद्र अजलसोंडे व आरोग्य सेवक श्री. हिरालाल तायडे यांनी केले.

यावेळी सरपंच सौ.वैशालीताई जितेंद्र महाजन, उपसरपंच श्री.संजय वाघ,ग्रा.प.सदस्य श्री.जितेंद्र महाजन, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे