अट्रावलच्या मुंजोबाने शुक्रवारी रात्री अग्नीडाग घेतला.
यावल – तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाने शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास अग्नीडाग घेतला आहे .यात्रेनंतर सुमारे साडेतीन महिन्यानंतर मुंजोबाने अग्नीडाग घेतला आहे. अग्नीडाग घेतल्याचे समजताच गावातील भाविकांनी रात्रीच मंदिरावर धाव घेतली तर पंचक्रोशीतील भाविकांनी शुक्रवारी सकाळी मुंजोबाच्या दर्शनासाठी धाव घेतली.
तालुक्यातील अट्रावल येथील खानदेश वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध मुंजोबा ची यात्रा साडेतीन महीन्यापुर्वी माघ शुद्ध पंधरवाड्यात पार पडली. गेल्या तीन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे बंद, असलेली यात्रा यावर्षी कोरोनाचे निर्बंध न पाळता लाखो भाविकांनी यात्रोत्सव काळात दर्शन घेतले यात्रोत्सवात भाविकांनी, मुंजोबास अर्पण केलेल्या पूजा, पत्री , लोणी याने मुंजोबा संपूर्ण झाकल्या जातो.हे सर्व साहित्य यात्रोत्सवानंतर आपोआप पेट घेत असते त्यालाच मुंजोबा ने अग्नीडाग घेतल्याचे म्हणतात .मुंजोबा यात्रेनंतर केव्हा अग्नीडाग घेईल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे अग्नीडागाची भाविकांमध्ये उत्सुकता असते. या वर्षी साडेतीन महीन्यानंतर मुंजोबाने अग्नीडाग घेतला आहे अग्नीडाग घेतल्याचे समजताच पंचक्रोशीतील भाविकांनी मुंजोबा च्या दर्शनासाठी धाव घेतली.