गुन्हेगारीयावल

तरूणीचा विनयभंग नागरिकांमध्ये तीव्र संताप गुन्हा दाखल

यावल ( प्रतिनिधी) – शहरातील एका मॉल मध्ये काम करणाऱ्या तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन ,याबाबत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी ,शहरातील एका मॉल मध्ये दिनांक २८ मे रोजी साडेसात वाजेच्या सुमारास कॅश काउंटरवर कामास असलेल्या एका १९वर्षीय तरुणीची ईक्रामोद्दीन अल्लाउद्दीन शेख ,राहणार आयशानगर यावल या तरुणाने तरूणी काम करीत असलेल्या मॉल मध्ये सामान घेण्याच्या बहाण्याने येवुन तरुणीच्या जवळ आला असता तु मला आवडते ,तु माझ्याशी लग्न करणार का व तु माझ्या घरी ये आपण मजा करू असे बोलुन तरूणीस लज्जा वाटेल असे कृत करून तिचा विनयभंग केला .        यावल पोलीस ठाण्यात त्या तरुणीने फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या गुन्ह्यातील संशयीतास पोलिसांनी अटक केले असुन, पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टेंबल संजय देवरे हे करीत आहे . दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच नागरिकांनी तिव्र संताप व्यक्त करत माॅलसमोर मोठी गर्दी केली होती घटनेचे वृत्त कळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे