यावल

यावलला दोन लाख रुपये किमतीचे गोवंश जातीचे गुरे जप्त यावल पोलिसांची कामगिरी

यावल – कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे विना चारापाणी बांधून ठेवलेली सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सतरा गोवंश जातीच्या गुरांना यावल पोलिसांनी मुक्त करत जीवदान दिले आहे याबाबत येथील पोलीस ठाण्यात गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चोपडा रस्त्यावरील ख्वाजा मशिदीचे मागील बाजूस पत्री शेडमध्ये जाकीर खान साबीर खान, उस्मान शेख सुलतान, शकीलखान निसार खान कुरेशी यांनी एक लाख 68 हजार रुपये किमतीचे 16 गोवंश जातीचे गुरे निर्दयपणे विना चारापाणी दोरीने बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आले त्याचप्रमाणे येथील खिर्णीपुरा भागात, आताऊल्ला अब्दुल खान यांचे घरासमोर निर्दयपणे बांधलेला 26 हजार रुपये किमतीचा बैल अवैधरित्या कत्तलीच्या उद्देशाने विना चारा पाणी बांधून ठेवलेला आढळून आला पोलिसांनी गोवंश जातीचे गुरे पोलीस ठाण्यात जप्त केली असून सफौ. असलमखान व पो. काॅ. सुशील घुगे यांचे दोन स्वतंत्र फिर्यादीवरून गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पो. नि. राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विनोदकुमार गोसावी, फौजदार अविनाश दहिफळे, सफौ मुजफ्फर खान , युनुस तडवी, सुशील घुगे नितीन चव्हाण सिकंदर तडवी विनोद चौधरी यांचे पथकाने केली आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे