पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.सुरेश गोसावी यांची भेट व किनगाव भेटीचे निमंत्रण.
यावल (प्रतिनीधी)-पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश वामन गोसावी यांची तालुक्यातील किनगाव येथील दिलीप वसंत पाटील यांनी नुकतीच पुणे विद्यापीठात भेट घेत डाँ.गोसावी व दिलीप पाटील हे वर्ग मित्र आहेत. किनगाव येथील नेहरू विद्यालयात सन १९८५ ते १९८८ या कालावधीत त्यांनी किनगाव येथे सोबत शिक्षण घेतले.डाँ.सुरेश गोसावी हे मुळचे धामणगाव ता.जळगाव येथील रहिवाशी असुन त्यांचे वडील वामण गिरी गोसावी किनगाव येथील नेहरू विद्यालयात शिक्षक तर मोठे बंधु किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंन्द्रात वैद्यकीय आधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यामुळे कुलगुरू डॉ गोसावींचे किनगाव जिव्हाळ्याचे सबंध आहेत.
तालुक्यातील किनगाव सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेत थेट विद्यापीठाच्या कुलगुरू पर्यंत चे शिखर गाठले. त्यामुळे किनगाव सह परीसरासाठी अभिमानाची बाब आहे. भेटीत दिलीप पाटील यांनी डॉक्टर गोसावी यांचे अभिनंदन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच किनगाव भेटीचे निमंत्रण दिले किनगाव भेटीचे निमंत्रण डॉ. गोसावी यांनी स्विकारत लवकरच किनगाव येथे येणार असल्याचे आश्वासन दिले.