जळगाव

“नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात दहावी व बारावी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा संपन्न ”

जळगाव – नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या सौजन्याने रोटरी भवन, मायादेवी नगर येथे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. प्रसंगी कार्यक्रमास प.पुज्य श्री महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज फैजपुर, मा.सौ. जयश्रीताई महाजन – महापौर म.न.पा. जळगाव , मा. आमदार राजू मामा भोळे, डॉ गौरव महाजन, डॉ प्राची महाजन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात एकूण 110 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमास अध्यक्षा सौ. मनिषा पाटील, अॅड. सीमा जाधव, नूतनतास खेडकर, श्रावणी पाटील, प्रतीक्षा पाटील, लीना पाटील, राधिका पाटील, अॅड. संगीता देशमुख, रेणुका हिंगु, शशी शर्मा, आशा मौर्य, मंदा सोनवणे, विद्या जकातदार, नेहा जगताप, अर्चना पाटील, संगीता चौधरी ,वंदना मंडावरे, हर्षा गुजराती, माधुरी शिंपी, नीता वानखेडकर,श्री.ललित धांडे मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनिषा पाटील, सूत्रसंचालन तुषार वाघुळदे व मंजुषा अडावदकर तर आभार प्रदर्शन श्रीमती प्रतीक्षा पाटील यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे