यावल

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना खान्देश ऑफ द इअर या पुस्काराने सन्मानीत

यावल (प्रतिनिधी)- राजकीय , कला , सामाजीक , शैक्षणीक, सांस्कृतीक आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणारे येथील माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांना सप्तरंग मराठी चॅनल व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था जळगाव या सामाजीक संस्थेच्या वतीने मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्धी अभिवेत्री भार्गवी चिरमुले यांचे हस्ते खान्देश ऑफ द ईअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जळगाव एम आय डी सी क्षेत्रातील प्रसिद्ध हॉटेल सेन्टर फॉरसिजन कॉटेजच्या सभागृहात सप्तरंग मराठी चॅनल व कर्तव्य बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ९जुलै रोजी सायंकाळी ६ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणुन मराठी सिनेसृष्टीची प्रसिद्धी अभिवेत्री भार्गवी चिरमुले , जळगाव जिल्हा लाॅयर्स ग्राहक संस्थेचे अध्यक्ष एड. संजय राणे ,कॅन्सर रोगतज्ञ डॉ निलेश चांडक, डॉ पी . आ.र चौधरी , ( सचिव, धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी ) ,या मान्यवरांच्या उपस्थित विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या सुमारे २७ जणांना या वेळी २o२३या वर्षाच्या खान्देश ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . यात येथील तालुका मराठा सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटिल यांचा सपत्नीक मराठी सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांचे हस्ते सत्मानपत्र देत गौरवविण्यात आले . त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते , हाजी फारूख शेख , पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, माजी उपनराध्यक्ष असलम शेख नबी ,माजी नगरसेवक समीर शेख मोमीन ,गणेश महाजन ,एजाज देशमुख ,एम.बी. तडवी, सारंग अडकमोल ,डाॅ. हेमंत येवले,प्रशांत पाटील ,डी बी पाटील,अय्युब पटेल , सुनिल गावडे,भरत कोळी आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे