यावल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने प्रेरित केरळच्या शिवभक्ताचे सायकल भ्रमन

यावल (प्रतिनिधी)- राज्याचे दैवत व हिन्दवी स्वराज्य संस्थेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास वाचुन प्रेरित झालेल्या केरळच्या कालीकत जिल्हा कोत्तापूर येथील शिवभक्त शिवराज गायकवाड ( पुर्वीचे नांव हमरास एम .के ) या २८ वर्षीय तरुणाने संपुर्ण राज्यातुन सायकलव्दारे भ्रमण करीत सुमारे १५००० किलोमिटरचा प्रवास करून यावल येथे आगमन झाले. गायकवाड यांनी यथे आल्यावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची भेट घेतली.

याप्रसंगी या शिवभक्ताचा तहसील कार्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला.या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी म्हटले की, या शिवभक्ताकडून छत्रपतींचा इतिहास गावोगावी पोहचत आहे हे कार्य आजच्या तरूण पिढीला उर्जा देणारे याचा तरूणांनी बोध घ्यावा. यावेळी शिवराज गायकवाड याने १४ महीन्यात १५हजार कि. मी. चचे अंतर सायकल ने पार करत शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सायकल प्रवास करीत दाखल झाला. यावेळी शहरातील तरुण मंडळींनी स्वागत केले . शिवराजने बि.कॉम पर्यंत शिक्षण घेतले असुन , तो दुबई येथे वाहनचालकाचे काम करीत असे मात्र छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाने प्रेरीत होवून पराक्रमी इतिहास देशवासीयांना माहीत व्हावा म्हणून त्याचे देशभ्रमन असल्याचे त्याने सांगितले. महाराजांचे १३वे वंशज खासदार उदयसिंगराजे भोसले यांनी या शिव भक्तास सायकल भेट दिली असल्याचे या तरुणाने सांगीतले . याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते ,महसुल कर्मचारी सुयोग पाटील ,युनुस खान ,संतोष पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे