यावल

गोंडगाव अल्पवयीन मुलीवरील हत्या प्रकरणी यावलला मुक मोर्चा

यावल (प्रतिनिधी)-यावल तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीवर लैगींक अत्याचार करून तिच्या हत्येच्या निषेर्धात मुक मोर्चाचे आयोजन केले होते .या मोर्चात सर्वधर्मीय व सर्वपक्षिय मुक मोर्चा काढण्यात आला. संशयित आरोपीला न्यायालयाने कठोरात कठोर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना देण्यात आले.

यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसर ते यावल तहसील कार्यालयापर्यंत मंगळवारी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्वधर्मीय व सर्वपक्षीय मुकमोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला.यावेळी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, पुरवठा निरिक्षण अधिकारी अर्चना भगत यांच्या उपस्थितीत चिमुकल्या मुलींच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. असंख्य नागरीकांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन देण्यात आले.तहसीलच्या आवारात जमलेल्या सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरीक मोर्चात सहभागी लहान चिमुकल्या व महिला यांच्या वतीने दुदैवी मयत झालेल्या चिमुकलीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, पं. स. चे गटनेते शेखर पाटील, , काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, आदिवासी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी, ठाकरे गटाचे अजहर खाटीक , रिपाइ चे तालुकाध्यक्ष विष्णु पारधे यांच्यासह मराठा समाजबांधव, मोठ्या संख्येत महिला भगिनी व चिमुकल्या मुली यांनी या मुकमोर्चात सहभागी होत अत्याचारास बळी गेलेल्या मुलीला न्याय मिळुन देण्याची मागणी केली. मोर्चा ला माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी संबोधले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे