जिल्ह्यात हवेची गुणवत्ता घसरली, प्रशासनाचा दावा फोल..
जळगाव (कृष्णराज पाटील) | जळगाव जिल्ह्यात तसेच विशेषता जळगाव शहरात गेल्या आठ पंधरा दिवसांपूर्वी हवेची गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाल्याचे तसेच राज्यात सर्वात उत्कृष्ट हवेचा निर्देशांक जळगाव शहराचा नोंदविण्यात आल्याचेही वृत्त जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. परंतु गेल्या दोन तीन दिवसात तसेच 27 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास हवेची गुणवत्ता अत्यंत घसरली असल्याचे नोंदीवरून दिसून आले आहे.
जिल्ह्यात विशेषतः खानदेशात जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत हवामान थंड हवामान आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे नंदुरबार परिसरात झाली आहे. त्यामानाने जळगाव जिल्ह्यात सायंकाळ नंतर रात्री उशिरा वातावरणात गारठा असला तरी पहाटेच्या वेळी धूकेयुक्त आल्हाददायक वातावरण आहे. ग्रामीण भागात धुकेयुक्त वातावरण रब्बी हंगामी पिकांसाठी पोषक असल्याचे चर्चिले जात आहे.
बहुतांश ठिकाणी गहू, हरबरा, मका, रब्बी ज्वारी, उन्हाळी बाजरी वाणाची पेरणी झाली आहे, काही ठिकाणी या वाणांची पेरणी सुरू आहे.
तर दुसरीकडे जळगाव शहरात मात्र हवेची गुणवत्ता अत्यंत मध्यम दर्जाची नोंदवली गेली आहे.
दुचाकी, प्रवासी ऑटो रिक्षा वा मोठया वाहनांच्या इंधनाच्यl ज्वलनाद्वारे अधिक प्रमाणात बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईड मुळे हवेच्या गुणवत्तेत घसरण झालेली दिसून येत आहे.