महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पिंप्राळ्यात जाहीर सभा…

जळगाव, -महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून आज दिनांक ४ जानेवारी २०२६ री रोजी सायंकाळी ५:०० वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष मा आ रवींद्र जी चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळा येथील भवानी मंदिर येथून महायुतीच्या ७५ उमेदवारांचे प्रचाराचे नारळ फोडून लगेचच प्रचंड जाहीर सभा घेण्यात येणार आहे.
या प्रसंगी भाजप नेते ना गिरीश भाऊ महाजन पालक मंत्री ना गुलाब भाऊ पाटील, केंद्रीय मंत्री ना रक्षाताई खडसे, ना संजयजी सावकारे, खा स्मिताताई वाघ, माजी मंत्री आ अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. सुरेश (राजू मामा) भोळे, आ मंगेश दादा चव्हाण, आ चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर अप्पा पाटील, आ. अमोल दादा जावळे, आ. चंद्रकांत पाटील आ. अमोल पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, RPI आठवले गट अनिल अडकमोल तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ५:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा येथे होणार असून महायुतीच्या सर्व ७५ उमेदवार व भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गट, RPI आठवले गट सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.