जळगाव

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, नूतन मराठा महाविद्यालयाच्या वतीने एकांकिका स्पर्धेचे आयोजन 

उमवि एकांकिका स्पर्धेत "पडदा" प्रथम, द्वितीय "कंदील", तृतीय "तो पाऊस" आणि "टाफेटा"...

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि नूतन मराठा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत चोपडा येथील डॉ. सुरेश जी पाटील चोपडा महाविद्यालयाची “पडदा” ही एकांकिका प्रथम आली.स्पर्धचे उदघाटन व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रा.डॉ.अंजली बोडार, राजेश भामरे ,महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ .एन जे पाटील,डॉ जयश्री सोनटक्के, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ.राहुल संदनशिव, परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील, वीरेंद्र पाटील हे उपस्थित होते. या वेळी नटराज पूजन, दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन घंटानाद करून झाले.उदघाटन सत्राचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.एन जे पाटील यांनी केले.

डॉ.राजेंद्र नन्नवरे यांनी, विद्यार्थी कलावंतांच्या नाट्य कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.एल पी देशमुख यांनी स्पर्धेचे आयोजनाची संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले तसेच अश्या प्रकारच्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो असे सांगितले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा एकांकिका स्पर्धेनंतर झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.सुरेखा पालवे,अध्यक्ष प्राचार्य एल पी देशमुख,राजेंद्र देशमुख, जेष्ठ रंगकर्मी,साहित्यिक चिंतामण पाटील, डॉ एन. जे. पाटील, विद्यापीठ प्रतिनिधी प्रा.डॉ अंजली बोडार, प्रा.डॉ राहुल संदनशिव,परीक्षक किरण अडकमोल, चिंतामण पाटील,वीरेंद्र पाटील,उपप्राचार्य के.बी.पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.डॉ.अफाक शेख यांनी केले. तर आभार प्रा.डॉ राहुल संदनशिव यांनी मानले.

स्पर्धेचा निकाल

प्रथम- सांघिक एकांकिका : डॉ.दादासाहेब सुरेश जी पाटील महाविद्यालय एकांकिका ‘पडदा ‘, द्वितीय – जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयाची एकांकिका ‘कंदील’, तृतीय – प्रताप महाविद्यालय अमळनेर यांची एकांकिका- ‘तो पाऊस आणि टाफेटा .उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक झेड बी पाटील महाविद्यालय, धुळे यांची एकांकिका “भारतीय”.

उत्कृष्ट दिग्दर्शन – प्रथम -पूनम बडगुजर (पडदा), द्वितीय – ज्योती पाटील – (कंदील), उत्कृष्ट नेपथ्य – प्रथम – हर्षल निकम (पडदा), द्वितीय – प्रशांत चौधरी (कंदील), उत्कृष्ट प्रकाश योजना – प्रथम – योगेश राजेश चित्रकभी (पडदा ), द्वितीय – उमेश चव्हाण (कंदील), उत्कृष्ट पार्श्वसंगीत – प्रथम – हर्षल पाटील (पडदा), द्वितीय – अभिषेक कासार (कंदील), उत्कृष्ट रंगभूषा – शिव वाघ (कंदील) उत्कृष्ट अभिनय – पुरुष – प्रथम – अक्षय ठाकरे (तो पाऊस आणि टाफेटा), द्वितीय लोकेश मोरे (कंदील), उत्कृष्ट अभिनय -महिला -प्रथम – रचना अहिरराव (पडदा ), द्वितीय – गायत्री सोनवणे (कंदील), उत्तेजनार्थ प्रमाणपत्र –

1.तेजल राजेंद्र पाटील– (पडदा)

2.सोनल शिरतुरे — (कंदील)

3.मयुरी धनगर –( तो पाऊस आणि टाफेटा)

4.प्रितेश भिल — ( तो पाऊस आणि टाफेटा)

5.स्वराज सावंत — ( भारतीय )

6.कल्पेश मिस्तरी ( भारतीय )

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे