यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज
अर्जांची संख्या ८८
यावल ( प्रतिनिधी)-येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या १७ संचालक पदाचे निवडीसाठी ४फेब्रुवारी रोजी होत असलेल्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी सोमवारी (८ जानेवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अर्जांची संख्या एकूण ८८ झाली आहे. मंगळवारी (९ जानेवारी ) अर्जांची छाननी होणार आहे
यावल खरेदी विक्री सहकारी संघाची दिनांक ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी ४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून उमेदवारी अर्जांची एकूण संख्या ८८ झाली आहे . १७ संचालक निवडीसाठी २८ हजार ७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४८ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, प्रमुख नामर्निदेशन अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये विद्यमान चेअरमन अमोल सुर्यकांत भिरूड यांच्यासह विद्यमान संचालक प्रभाकर सोनवणे , विनोदकुमार पाटील, सुनिल बाळकृष्ण नेवे , नरेन्द्र नारखेडे , तुषार ( मुन्ना )सांडूसिंग पाटील, उमेश रेवा फेगडे , गणेश गिरधर नेहते ,नितीन नेमाडे , यशवंत तळेले , प्रशांत चौधरी , तेजस पाटील, भारती चौधरी , नितिजा किरंगे व तज्ञ संचालक डॉ हेमंत येवले व लहु पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रा. मुकेश येवले, यांचा समावेश आहे.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे हे काम पहात आहे.