बलवाड़ी प्रतिनिधी – आशीष चौधरी
रावेर तालुक्यातील भामलवाडी परिसरात शुक्रवार पासून बिबटयाचा वावर वाढला असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.शुकवारी पहाटेच्या सुमारास गायीला फस्त केले होते तर शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बकरीवर हल्ला करून बकरी जबर जखमी केली.यावेळेस काही गावकऱ्यांना हा बिबटया दिसला व गावकऱ्यांनी आरडाओरड करताच बिबटयापळून गेला.मात्र रात्रभर गावात भितीचे वातावरण होते.
सविस्तर वृत्त असे की भामलवाडी येथे महादेव मंदिराजवळ बिबट्याने एका गाय फस्त केल्याची घटना शुक्रवारी पहाटे १:३० ते २:०० वाजेच्या सुमारास घडली होती. गणेश कोळी यांच्या गोठ्यात गाय दावनिला बांधलेली होती . परंतु रात्रीच्या वेळेस बीबट्याने हळुच गोठ्यात शिरून गायी वर हल्ला करून तिला फस्त केले आहे .
याबाबत पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी वन विभागाला सुचवले असता रावेर वनक्षेत्रपाल अधिकारी अजय बावणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ए एच पिंजारी यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला होता तसेच घटना स्थळी ऐनपुर पशवैद्यकीय अधिकारी ठवरे यांना पाचारण करून त्यांनी गायी वर बिबट्याने हल्ला केल्याचे निष्पन्न केले आहे होते. तर शनिवारी सायंकाळी पुन्हा बिबट्या गावात पुन्हा शिरला व त्याने गावाबाहेरील मधुकर पाटील यांच्या बकरीवर हल्ला करून बकरीला जबर जखमी केली.बकरीही वाचण्याची शक्यता कमीच आहे.तीन ते साडेतीन फुट उंचीच्या या बिबटयाला काही लोकांनी बघीतले त्यांनी आरडाओरड करताच गावालगत बिबटया पळून गेला.यावेळी पोलिस पाटील प्रमोद पाटील यांनी निंभोरा पोलिस स्टेशनला व वन विभागाला सुचवले असता निंभोरा पो.स्टे.चे सहा.पोलिस निरिक्षक तसेच वन विभागाच्या पथकाने गावात भेट दिली तसेच रात्रभर वनविभागाचे पथक गावातच राहणार असल्याचे सांगितले.