ब्रेकिंग

जळगावात पकडले ९ लाखाचे ड्रग्स : शहर पोलिसांची कारवाई..

जळगाव (प्रतिनिधी) – नुकतीच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात सुमारे ७२ लाख ८० हजार रूपये किंमतीचे ९१० ग्रॅम एमडी ड्रग्स पकडल्याची मोठी कारवाई झाली असतांना लागलीच दुसऱ्या दिवशी जळगाव शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या तरूणाला आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या दोन जणांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरूवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री अटक केली असून त्यांच्याकडून १२२ ग्रॅम वजनाचा ९ लाख ७७ हजार ७६० रूपये किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये इम्रान उर्फ इम्मा हसन भिस्ती रा. शाहू नगर, जळगाव आणि गोकूळ उर्फ रघु विश्वनाथ उमप (वय-४०, रा. कंजरवाडा) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरात एमडी ड्रग्सची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुधीर साळवे यांना मिळाली.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू नगरात सापळा रचण्यात आला. शाहू नगरात पडक्या शाळेजवळ संशयित आरोपी इम्रान भिस्ती हा ड्रग्स विक्रीसाठी येताच त्याला पाथकाने अटक केली. त्याच्याजवळ तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन पुड्यांसह एकुण ९ लाख ७७ हजार ७६० रुपये किमतीचे १२२ ग्रॅम वजनाचे ड्रग्स आढळूल आले. शिवाय त्यांच्या जवळील दोन मोबाईलही जप्त केले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने एमडी ड्रग्स साठा गोकुळ उमप यांच्या कडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी गोकुळ उमप यालाही अटक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, सुधीर सावळे, हवालदार भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते, अमोल ठाकुर, सुनिल बडगुजर, किरण ठाकरे यांनी केली कारवाई.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे