जामनेरशेत-शिवार

जामनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी..

जामनेर – जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ९ आणि ११ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शिवारात जाऊन केली.

जामनेर तालुक्यात दि. ९ व ११ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे अनुषंगाने नुकसानीची यावेळी पाहणी करण्यात आली. यामध्ये मौजे लोणी गावच्या शिवारातील मका पिकाचे झालेले नुकसानी पाहणी केली. तसेच झाड पडून घराचे नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यात आली.तालुक्यातील मौजे लोणी, जंगीपुरा येथील पिकांचे नुकसान व घरांच्या पडझडीचीही पाहणी केली. मौजे शेंदुर्णी या गावाच्या शिवारातील बाजरी,मका, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे त्याची पाहणीही जिल्हाधिकारी यांनी केली.पाहणी केल्यानंतर महसूल विभाग, कृषी विभाग तसेच ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय अधिकारी यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे