जळगाव जिल्हा

कुऱ्हाकाकोडा येथे मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांसाठी उद्द्योग उभे करणार : श्रीराम पाटील 

प्रतिनिधी / मुक्ताईनगर 

कुऱ्हा काकोडा हा परिसर विकासापासून दुर्लक्षित राहीलेला आहे. या पारिसरात युवकांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी या परिसरात मिनी एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभे करू असे आश्वासन रावेर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार  गट ) उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिले.

रावेर मतदार संघातील कुऱ्हाकाकोडा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयी करण्याचा निर्धार व्यक्त  केला. यावेळी संवाद साधताना नागरिकांनी युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मांडला. सर्व समस्या ऐकून घेतल्यावर उमेदवार पाटील यांनी  नागरिकांना या परिसरात उद्योग उभे करण्यासाठी भावी काळात आपले प्रयत्न राहतील असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) माहिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ जगदीश पाटील, दशरथ कांडेलकर, सरपंच बी सी महाजन, संजय पाटील, निलेश पाटील, संतोष बोदडे, दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असे  यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले. वढोदा,महालखेडा, निमखेडी, सुकळी, अंतुर्ली, दुई या गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. वढोदा येथे उप सरपंच रंजना कोथळकर, इम्रान काझी, रशीद मेम्बर यांच्यासह नागरिकांशी संवाद साधला. अंतुर्ली येथे नागरिकांनी उमेदवार श्रीराम पाटील यांचे स्वागत केले. यावेळी यु डी पाटील, निवृत्ती पाटील, ईश्वर राहणे, पवनराजे पाटील, दिनेश पाटील विश्वास पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

विकासाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जागा दाखवू : बी सी महाजन

गेल्या दहा वर्षात कुऱ्हाकाकोडा परिसराकडे लोकप्रतिनिधींनी कायम दुर्लक्ष केले असून अशा उमेदवाराला या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ असा निर्धार कुऱ्हा परिसरातील नागरिकांनी केला असल्याचे बी सी महाजन यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे