गुन्हेगारीब्रेकिंगभुसावळ

भुसावळ मध्ये पुन्हा गोळीबार दोन जण जागीच ठार..

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. जुन्या सातारा परिसरातील मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांनावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याची माहिती मिळत आहे.

 भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथं डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

 दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत. दोघ मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे