मंगल पुरी अपघातातील मृत शोभा ताईच्या अंध मुलाच्या मदतीला धावून आली मुस्लिम बिरादरी..
जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी मंगल पुरी परिसरात पाच दिवसांपूर्वी एका वाहन चालकाच्या हस्ते अपघात होऊन साईप्रसाद कॉलनी मधील शोभा रमेश पाटील या मृत पावल्या त्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सेवा करून आपले आजारी पती, दोन मुली व आंधळ्या मुलाचे उदरनिर्वाह करीत होते या कुटुंबीयांचा करता करवणारा निघून गेल्या असल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट आले असून त्यांना मदतीची गरज असल्याचे निवेदन एस एम व्हॉट्सअँप ग्रूप च्या माध्यमाने प्रसारित झाले होते.
सदर संदेश मुस्लिम मनियार बिरादरी च्या निदर्शनास आल्यावर बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, खजिनदार ताहेर शेख,मुश्ताक शेख, साहिल मनियार,सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींनी साईप्रसाद कॉलनी गाठून दीपक पाटील या अंध व्यक्तीला ५ हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य करून त्याच्या कुटुंबियांसाठी सरकारी योजनांमधून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्या ठिकाणी एस एम व्हॉट्सअँप ग्रूप चे एडमिन अनिल सोनवणे सह वासुदेव ठाकूर व रमेश पाटील यांची उपस्थिती होती
ईतर महत्वाच्या बातम्या
१ कोटी ६ लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त,विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई..
‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर