जळगाव जिल्हा

यावल वनविभागात पहिल्यांदाच सातपुडा निसर्ग पाऊल वाटेला सुरुवात..

उमटू द्या तुमच्या पाऊलखुणा

जळगाव – उपवनसंरक्षक म.जमीर मुनीर शेख, यावल वन विभाग जळगाव यांच्या संकल्पनेतून आपल्या सातपुड्यात एक निसर्ग पाऊलवाट तयार करण्याचा संकल्प हाती घेतला होता, म. प्रथमेश व्ही.हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान एम.सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने वैजापूर वनक्षेत्रात सातपुडा निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली, तरी आज दि.3 रोजी वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून या पाऊलवाटेच उद्घाटन म.उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यास सुंदर असं सातपुड्याचा वैभव लाभलेला आहे, या सातपुड्याचा संरक्षण संवर्धन आणि आपला सातपुडा जगासमोर आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे 21 व्या शतकात जीवन जगत असताना मानवी जीवन हे फार धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे अशातच आपल्याला एक निवांत वातावरण आणि निसर्ग अनुभवण्यासाठी ही निसर्ग पाऊलवाट आम्ही सुरू केलेली आहे, शहरापासून कुठेतरी लांब आणि नैसर्गिक वातावरणात मन रमण्यासाठी किंवा मोबाईल पासून दूर जाण्यासाठी निसर्ग हीच खरी शांतता आहे, आणि सध्याच्या काळात निसर्गात जाऊन फोटोग्राफी करणे हा फार मोठा ट्रेण्ड आहे म्हणूनच ह्या पाऊलवाट वरती तुम्हाला सातपुड्याने पांघरलेली हिरवी शाल पहावयास मिळणार आहे, जसं की पाऊलवाट वरती चालण्यास सुरवात झाली की आपल्याला सातपुडा व्हीव पहावयास मिळणार, पुढें तूम्ही तुमचा ट्रेक पूर्ण करत असतांना चौसिंगा मचाण,नीलगाय संरक्षण कुटी, बिबट मचाण आणि पश्चिम प्रदेशातील नवरंग ह्या पक्षाचे दर्शन होणार आहे व नैसर्गीक वाहणारा पाण्याचा नाला ही पहावयास मिळणार आहे,तसेच जुन्या काळातील एक नावजी बाबा मंदीर म्हणून शेवटचा ठिकाण पहावयास मिळणार आहे, तसेच काही वनस्पती व झाडांचीही ओळख होणार आहे, ही पाऊलवाट एकंदरीत 3 किमी अंतराची असून परतीला 6 किमी अंतराची असणार आहे आणि एक शारीरिक ऊर्जा ही देणारी आहे,हे सर्व तूम्ही पायी ट्रेक करत अनुभवत असतांना पाऊलवाटा वरती थकल्यास किंवा विश्रांती साठी बांबू पासून बनवलेले नैसर्गिक टेबल ही बनवण्यात आले आहेत,या पाऊलवाट वरती चालत असताना तुम्हाला स्वतःसोबत निसर्गाची काळजी घ्यावयाची आहे ती म्हणजे अशी की, पायी चालत असताना कोणत्याही झाडाच्या पानांना फुलांना इजा पोचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तसेच स्वच्छतेचे भान ठेवून निसर्गात कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही किंवा प्लास्टिकचा वापर टाळावयाचा आहे तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी किंवा वन्य प्राण्यांचा अधिवास जाणून घेण्यासाठी तुम्हाला शांततेत पाऊलवाट वरती चालावयाचे आहे आणि वन विभागातील वनसेवक किंवा वन कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावयाचे आहे.

या निसर्ग पाऊलवाट वरती येण्यासाठी तुम्हाला निसर्गाशी मिळत्या जुळते कपड्यांचा वापर करावयाचा आहे, पिण्यासाठी पाण्याची बॉटल स्वतः आणावी तसेच पक्षी निरीक्षण करण्यासाठी आपण स्वतःची बायना कुलर आणावी. ह्या सर्व बाबी लक्षात घेता सातपुडा निसर्ग पाऊलवाट आणि यावल वनविभाग जळगांव हाच संदेश देणार आहे की आपला सातपुडा एवढा सुंदर असुन त्याचं महत्व, संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपण एकदा तरी सातपुड्याच्या कुशीत जाऊन त्याला अनुभवयाचा आहे व त्याचे संरक्षण आणि संवर्धनसाठी एक जुटीने करावयाचे आहे.

          जमीर मुनीर शेख(उपवनसंरक्षक)                           यावल वनविभाग जळगांव

ईतर महत्वाच्या बातम्या 

हरिपूरा आश्रमशाळा येथे वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने “मानव-वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव”जन जागृती सभेचे आयोजन….

तिळवण तेली समाज सभागृहासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला २६ लाखाचा निधी..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे