गुन्हेगारीब्रेकिंगरावेर

१० हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात…

रावेर – तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षकास १० हजारांची लाच घेताना जळगाव एसीबी च्या पथकाने रंगेहाथ पकडले असुन कैलास विश्वनाथ ठाकूर असे कारवाई झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोठ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध निंभोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची इर्टिगा वाहन जप्त करण्यात आले होते तक्रारदार यांचे जप्त वाहन सोडून देण्याचे मोबदल्यात प्रथम १५०००/ रु लाचेची मागणी केली होती.यादरम्यान तक्रारदार यांनी दि.१२ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगांव कार्यालयात तक्रार दिली होती. दि.१२ रोजी  लाच मागणी पडताळणी केली असता पोलिस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांनी प्रथम १५०००/ रु व तडजोडीअंती १००००/ रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर दि.१२ रोजी पोलिस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना १००००/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.त्यांचेवर निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक, सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, दिनेशसिंग पाटील, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे, सुरेश पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर यांनी ही कारवाई केली

ईतर महत्वाच्या बातम्या 

कृषी विभागाची कारवाई : बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….

‘रेडिओ मनभावन’ युवा जलसंवर्धन अभियानाला प्रारंभ

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे