गुन्हेगारीजळगावब्रेकिंग

जळगांव जिल्हा कारागृहात भुसावळ खून प्रकरणातील कैद्याचा खून…

जळगाव, (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना सुरु असतांना आज दिनांक १० जुलै रोजी पहाटेच्या सुमारास जळगाव येथील कारागृहात एका आरोपीचा खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली, दोघा आरोपीमध्ये वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळचे माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी भुसावळात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात येउन त्यांना जळगाव येथील कारागृहात न्यायालयीन कोठळीत ठेवण्यात आले होते. दरम्यान, या खून प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचे दुसरा आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसऱ्या आरोपी याने मोहसीन असगर खान (वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

ईतर महत्वाच्या बातम्या

नशिराबाद येथे सौर उर्जा प्रकल्पासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करणार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची घोषणा.

सेतू चालकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यासाठी एक दिवसीय संप..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे