गुन्हेगारी

जळगाव पोलिसांची धडक कारवाई : 62.07 ग्रॅम MD जप्त..

जळगाव : अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने आणखी एक मोठी कारवाई करत एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतून 62.07 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासादरम्यान अमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका संशयिताचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 31 जुलै 2026 रोजी रात्री 10.40 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक गस्त घालत असताना वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर ए-14 समोरील रस्त्यावर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्याचे नाव इम्रान खान हयात खान (वय 36) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या करीमनगर, फातिमानगर, एमआयडीसी, जळगाव येथे वास्तव्यास आहे. तपासादरम्यान रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने इम्रानला विक्रीसाठी एमडी पुरवल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे संपूर्ण नाव व इतर तपशील तपासाधीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी 39.06 ग्रॅम एमडी (₹1.96 लाख), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (₹36 हजार) आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (₹56 हजार) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी (किंमत ₹2.88 लाख) जप्त केला. याशिवाय आरोपीकडील रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹20 हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹50 हजार) जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹3 लाख 58 हजार इतकी आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 635/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8(क), 22(क), 29 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही बेकायदेशीर हालचालींची माहिती निर्भयपणे पोलिसांना द्यावी, असे आवाहन जळगाव पोलिसांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे