जळगाव

जळगाव शहर पोलिसांनी : अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या..

जळगाव – शहर पोलिसांनी अट्टल वाहन चोरट्यांना शिताफीने अटक करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. या कारवाईत तब्बल २.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शोध पथकाच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.१४ जुलै रोजी गोलाणी मार्केटसमोर मायटी ब्रदर्स दुकानासमोरून फोर्स कंपनीचा टेम्पो (एमएच-१९-०६६६) आणि किर्लोस्कर कंपनीचा ३० किलोवॅटचा जनरेटर चोरीला गेला होता. एकूण ९१,००० रुपयांच्या या चोरीप्रकरणी मिलिंद मुकुंद थत्ते यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी गुन्हे शोध पथकाच्या दोन टीम्स तयार केल्या सदर पथक यांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शक्कल लढवत तपास केला.टेम्पोसह आरोपी जामनेर–बोदवड मार्गे मलकापूर–नांदुरेकडे जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला. वडनेर भोईजी गावाजवळ टेम्पो अपघातग्रस्त अवस्थेत आढळला. काही अंतरावरच एका ढाब्यावर आरोपी जखमी अवस्थेत बसलेले दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, रा. कांचन नगर, जळगाव – सध्या रा. शिरसोली)यश अनिल सोनार (वय २०, रा. समता नगर, जळगाव – सध्या रा. शिरसोली)दोघांनी जळगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून जनरेटर व्हॅन, टाटा एस छोटा हत्ती मालवाहतूक वाहन आणि ५ मोटारसायकली असा एकूण २,३६,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर कारवाई – स.फौ. सुनील पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, वीरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, पो.ना. भगवान पाटील, पो.कॉ. अमोल ठाकूर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ, प्रणय पवार तसेच नेत्रम येथील पो.कॉ. पंकज खडसे आणि मुबारक देशमुख यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे