मुक्ताईनगर नगर मध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त : LCB ची कारवाई…

मुक्ताईनगर – स्थानिक गुन्हे शाखा तसेच मुक्ताईनगर नगर पोलिसांनी सापळा रचून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांचा मुद्दे्मालासह गुटखा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी मुक्ताईनगर सारोळा फाटा येथे नाकाबंदी केली दरम्यान संशयित आयशर ट्रक (क्र. MH 40 CD 9358) दिसला. पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला तरी वाहनचालकाने ट्रक न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी 11:30 वा. सारोळा फाट्यावर संशयित ट्रक ताब्यात घेतला.
ट्रक मध्ये ७७ लाखांचा गुटखा, २५ लाखांचा ट्रक व १२ हजारांचा मोबाईल असा एकूण १ कोटी २ लाख ३३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक चालक आशिष राजकुमार जयस्वाल (रा. देवास, मध्यप्रदेश) याला अटक केली असून, ट्रक मालक आशिक खान बुल्ला खान (रा. नागपूर) याच्यावरही गुल्ला दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने जुलै पासून गुटखा निर्मिती, साठा आणि वाहतूक यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपींवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल गायकवाड, मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक जयेश पाटील, सोपान गोरे, तसेच सलीम तडवी, छगन तायडे, रतन गीते, मयूर निकम, भरत पाटील, देश पाटील, भाऊराव घेते, अशी तडवी, राकेश धनगर आणि संदीप धनगर यांनी ही कारवाई यशस्वी केली.