यावल महाविद्यालयात महिलांचे आरोग्य व समस्या विषयावर डॉ. वैशाली निकुंभ यांचे मार्गदर्शन..
यावल दि.४ ( सुरेश पाटील) यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर युवती सभा कार्यशाळेअंतर्गत महाविद्यालयात आरोग्य विषयक व्याख्यान देण्यात आले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.वैशाली निकुंभ (ग्रामीण रुग्णालय, यावल) यांनी महिलांचे आरोग्य व समस्या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थिनींनी कोणताही आजार अंगावर न काढता त्याची वेळीच दक्षता घेऊन शासकीय,खाजगी रुग्णालयात जाऊन तपासणी करून उपचार करायला हवा वाढत्या वयाप्रमाणे मुलींच्या शरीरात वेगवेगळे बदल होत जातात रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या,दूध केळी,अंडी,गाजर,लिंबू,आवळा ह्या फळांमध्ये जास्तीत जीवनसत्त्व असतात म्हणून १८ ते २१ वयोगटातील मुलींनी रोजच्या आहारामध्ये खाणे आवश्यक आहे मुलांकडे आकर्षित न होता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. मासिक पाळीच्या समस्या लपवणे,सतत चिंताग्रस्त राहणे, मोबाईल युट्यूबवर चुकीचे मग्न असणे, घरातील बंधणे न पाळता धाडस बाळगणे ,योगा करणे महत्त्वाचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमध्ये आहारात प्रथिने युक्त फळे ताजा भाजीपाला वापरणे तेलकट पदार्थ खाणे टाळावे उन्हाळ्याच्या दिवसात जास्तीत जास्त शरीराला आवश्यक तेवढे पाणी प्यावे,नारळ पाणी, ताक,लिंबू सरबत घ्यावे कोणत्याही वयातील मुलींनी आजाराच्या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गोळ्या औषधे वापरावे असे सांगितले कार्यक्रमाचे दुसऱ्या सत्रात ग्रामीण रुग्णालय यावल येथे जाऊन क्षेत्रीय भेट दिली व रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ओळख करून दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन प्रा.प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. वैशाली कोष्टी आणि मानले यावेळी कार्यक्रमाला डॉ. निर्मला पवार,प्रा.सि.टी.वसावे,प्रा. सुभाष कामडी, प्रा.भावना बारी डॉ.संतोष जाधव, प्रा. हेमंत पाटील, प्रा.प्रशांत मोरे,उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या