१० हजाराची लाच , सरपंचासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..
पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा गावातील घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता सरपंचाने १० हजाराची लाच मागितली. ती लाच स्वीकारताना खाजगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अनिल विश्राम पाटील असे सरपंचाचे नाव असून बलराम हेमराज भिल खाजगी इसमाचे नाव आहे.
मिळाली माहिती अशी की यातील तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी असून त्यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले होते . परंतु तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नावे लावण्यासाठी सदरचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याचा मोबदल्यात सरपंच यांनी १० हजार रुपयांची लाच मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने लाच मागणी पडताळणी केली असता अनिल विश्राम पाटील, सरपंच खडकदेवळा यांनी सदर काम करून देण्याचे बदल्यात 10000/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम बलराम हेमराज भिल, खाजगी इसम यांच्याकडे देण्यास सांगितले. बलराम हेमराज भिल, यांना दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पाचोरा पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
यांनी केली कारवाई जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला
ईतर महत्वाच्या बातम्या
सावदा परिसरात अवैध धंदे जुगार अड्डे जोमात, पोलीस प्रशासन कोमात..
कॉल सेंटरद्वारे प्रलोभन देवुन आँनलाईन बेटींगद्वारा जुगार खेळणाऱ्यांवर रावेर पोलीसांची कारवाई..