गुन्हेगारीरावेर

कॉल सेंटरद्वारे प्रलोभन देवुन आँनलाईन बेटींगद्वारा जुगार खेळणाऱ्यांवर रावेर पोलीसांची कारवाई..

रावेर – दि.२४ रोजी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना गुप्त बातमीदारां मार्फत बातमी मिळाली की, सुमनगनर, रेल्वे स्टेशनरोड, रावेर येथील दत्तु डिगांबर कोळी यांचे राहते घरात काही ईसम हे मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन गेम अँप तयार करुन लोकांना आमिष दाखवुन त्यावर पैशांची हार जितचा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहीत करुन त्यांना पैशांची गुंतवणुक करण्यासाठी प्रलोभन देत आहे अशा मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जावुन रेड केली असता त्याठिकाणी 1) अभिषेक अनिल बानिक वय.19 रा. मनिषनगर नागपुर 2) साहिल खान वकिल खान वय.22 रा. पन्हाना ता पन्हाना जि. खंडवा (म.प्र) 3) बलविर रघुविर सोलंकी वय. 22 रा. जावल ता.जि. खंडवा (म.प्र), 4) अंकित धर्मेंद्र चव्हाण वय.19 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र), 5) साहिद खान जाकिर खान वय.19 रा. खडकवाणी ता. कसरावद जि. खंडवा (म.प्र, 6) गणेश संतोष कोसल वय.25 रा. पन्हाना ता. पन्हाना जि. खंडवा (म.प्र) असे इसम www.wood777.com या वेबसाईटवर व्हाट्सअँप द्वारे लिंक पाठवुन लोकांना वेगवेगळे ऑनलाईन जुगार खेळाकरीता प्रोत्साहन देत होते. त्यांचे कडुन 09 मोबाईल फोन, 02 लॅपटॉप, 01 लॅपटॉपचे चार्जर, 01 एक्सटेंशन बोर्ड असा एकुण 1,15,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपीतांची कृत्य महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 4,5 प्रमाणे होत असल्याने त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सपोनि अंकुश जाधव, पोहेकाँ रविंद्र वंजारी,पोना सुनिल वंजारी, पोकाँ सचिन घुगे, पोकाँ विशाल पाटील, पोकाँ प्रमोद पाटील,पोकाँ महेश मोगरे, पोकाँ समाधान ठाकुर, पोकाँ संभाजी बिजागरे यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे