जळगाव

वनसंवर्धन व स्थानिक समुदायांचा सर्वांगीण विकासा करीता कल्पतरु सेवा फांडेशनचा यावल वनविभाग,जळगांव यांच्याशी सामंजस्य करार..

जळगाव –  दि.४ रोजी उपवनसंरक्षक जमीर शेख यावल वन विभाग, जळगांव यांचे कार्यालयात कल्पतरु सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष- मयुर अरुण पाटील यांनी यावल वन विभागात सातपुडा पर्वतरांगांत जल पुनरुज्जीवन, शेतीसाठी जलस्त्रोतांची निर्मिती वनसंवर्धन आणि स्थानिक समुदायांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने उपक्रम अंमलबजावणी करणेकामी करार करण्यात आला.

सदर उपक्रमात- जल पुनरुज्जीवन उपक्रम, शेतीसाठी व दैनंदिन वापरासाठी जलस्त्रोतांची निर्मिती, जंगलतोड थांबवण्यासाठी पुढाकार, वनजमीन संवर्धन, स्थानिक समाजासाठी सर्वांगीण विकास प्रकल्प, जैवविविधता संवर्धन, समुदायाचा सहभाग, पाणलोट व्यवस्थापन, जलसंधारण जागरुकता, उपजीविका सुधारणा, सामुदायिक सहभाग या उद्दीष्टानुसार कल्पतरु सेवा फाऊंडेशन– देखरेख आणि मुल्यमापन, अहवाल देणे, निधी आणि संसाधने बाबत संयुक्तिक जबाबदाऱ्याद्वारे करार करण्यात आला. सोबत जमीर एम.शेख, उपवनसंरक्षक, यावल वन विभाग, जळगांव व कल्पतरु सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष- मयुर अरुण पाटील उपस्थित होते.

ईतर महत्वाच्या बातम्या 

यावल वनविभागात पहिल्यांदाच सातपुडा निसर्ग पाऊल वाटेला सुरुवात..

हरिपूरा आश्रमशाळा येथे वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने “मानव-वन्यजीव संघर्ष निवारण” तसेच “वने व वन्यजीव”जन जागृती सभेचे आयोजन….

महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे