बोदवड जवळ भीषण अपघात : रेल्वे फाटक तोडून ट्रक थेट रेल्वे ट्रॅकवर..
बोदवड – तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. तर तीन रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता. दोन पॅसेंजर रद्द करण्यात आल्या .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ट्रक क्रमांक टी एन 52- एफ -7472 आज दि. 14 रोजी सकाळी 4.45 वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर कडून बोदवड कडे गहू घेऊन जात होता. रेल्वे ओव्हर ब्रिज वरून न जाता बंद असलेल्या रेल्वे गेट तोडून ट्रॅकवर आला. त्याचवेळी अमरावतीकडे जाणारी अमरावती एक्सप्रेस वेगात असल्याने ट्रकला धडक देऊन 200 ते 300 मीटर पर्यंत ओढत नेले. यामुळे रेल्वे इंजिनचे नुकसान तर झालेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी मदत करण्यासाठी पोहचले.
अपघात एवढा भयानक होता की रेल्वे इंजिन खाली अर्धा ट्रक अडकलेला होता. त्यामुळे त्याला काढण्यासाठी क्रेन जेसीबी घटनास्थळी बोलवण्यात आले व ट्रक काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. तसेच परिसरातील विद्युत पुरवठा ही बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एक्सप्रेस नवजीवन एक्सप्रेस दुरंतो एक्सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात आले तर भुसावळ बडनेरा व बडनेरा नारखेडा कडे जाणारी पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली. तर काही गाड्या वरणगाव भुसावळ कडे थांबवण्याची माहिती मिळाली.
याबाबत अधिक माहिती अशी की अमरावती कडे जाणारी अमरावती एक्सप्रेसला रेल्वे ट्रॅकवर ट्रक येऊन धडकल, या घटनेत कुणालाही दुखापत किंवा मृत्यू झालेला नाही. ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड येणाऱ्या जुना रस्ता खालून होता, ओव्हर ब्रिज झाल्यामुळे हा रस्ता बँरीकेड लावून बंद केलेला असतो, ट्रक ड्राइवरला हा रस्ता माहित असावा, पूल सुरु होऊन दीड एक वर्ष होत झालंय दीड वर्षांपूर्वी या रोडने हा ट्रक ड्राइवर गेला असेल म्हणून तो पुलावर न जाता खालच्या रस्त्याने जात असावा. गॅस कटर ने ट्रक कट करायचे काम सुरू होते.Jcb च्या साहाय्याने ट्रक काढन्यात आला ही घटना 4:45 च्या आसपास ची आहे. तर रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांचे संपर्क त्यांनी सांगितले की इंजिनचे ही नुकसान झालेले आहे अपघात झालेले इंजिन दुरुस्तीसाठी पियोजकडे पाठवण्यात येणार आहे तर अमरावती एक्सप्रेस ला नवीन इंजिन लावण्यात आले. तिला रवाना करण्यात आले.