जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघासाठी १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात..
जळगाव शहर मतदार संघात सर्वाधिक २९ उमेदवार..
जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून ९२ उमेदवारांची माघार
जळगाव, – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या २३१ उमेदवारीपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या आजच्या दि.४ नोव्हेंबर शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदार मतदार संघासाठी एकूण १३९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिले आहेत. अशी माहिती निवडणूक शाखेमार्फत प्राप्त झाली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्य उमेदवारांची संख्या)चोपडा-९ (७) रावेर-९ (१४), भुसावळ-९ (७) जळगाव शहर-२९ (८) जळगाव ग्रामीण-११ (६) अमळनेर-१२(४), एरंडोल-१३ (०७) ,चाळीसगाव-८ (८) पाचोरा-१२ (१२) जामनेर-१०(१२)मुक्ताईनगर-७ (१७)याप्रमाणे आहे.
सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११ विधानसभा मतदार संघात २३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते . दरम्यान मघारीच्या अंतिम दिवशी एकूण ९२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत .