ताबापुरात दुपारी दोन गटात दगडफेक : किरकोळ कारणावरून वाद..

जळगाव – शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या बगीचामध्ये आज दुपारी क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद काही मिनिटांतच वाढल्याने तांबापुरा परिसरात दगडफेक झाली . या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तसेच अतिरिक्त पोलीस दल व आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दगडफेकीत चार जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असून, त्यांच्यावर स्थानिक आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त, दगडफेकीमुळे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती आहे.
पोलिस तपास करत आहेत.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.या घटनेनंतर शहरात कोणताही अनपेक्षित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांतता आणि संयम पाळण्याचे आवाहन केले आहे. “परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून जातीय सलोखा बिघडवणारे किंवा चिथावणीखोर संदेश पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.