3 लाखाची लाच : RTO अधिकाऱ्यासह खाजगी पंटर ACB च्या जाळ्यात..
छत्रपती संभाजीनगर ACB ची जळगावात मोठी कारवाई..

जळगाव – जळगाव जिल्हा आरटीओ कार्यालयात छत्रपती संभाजी नगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह खाजगी पंटरला घेतले ताब्यात.
तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नोव्हेंबर 2024 या महिन्यात नियुक्ती दिल्याचा मोबदला म्हणून 3 लाख रुपये लाचेची मागणी करून, प्रादेशिक परिवहन अधिकारी, दीपक अण्णा पाटील , यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकन मुकुंद भावे मार्फत पंच साक्षीदारा समक्ष 3 लाख लाच स्वीकारली असता खाजगी इसम भिकन मुकुंद भावे व प्रादेशिक परिवहन अधिकारी, दीपक अण्णा पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असून एम.आय.डी.सी.पो.स्टे जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सदरची करवाई –
छत्रपती संभाजी नगर ला. प्र. वि. चे पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, अमोल धस, पो हे कॉ अशोक नागरगोजे, युवराज हिवाळे,पोअंम , विलास चव्हाण सचिन बारसे, सी एन बागुल. यांनी केली.