ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची साखळी तयार करणार – जयंत पाटील

जळगाव – गावागावात ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची साखळी तयार करण्यात येणार आहे. त्यातुन त्यांच्या उत्पादीत शेत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांची साखळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
नागपुरच्या ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. व रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीया यांच्या सहकार्याने हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शेतीचे शाश्वत उत्पन्न वाढवून देणारे जैविक खते आणि जैव-कीटकनाशक यांचे उत्पादन ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि.ने केले आहे. त्यास पेटंटही मिळालेले आहे. हे पेटंटेड उत्पादन शेतकर्यांच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकासासाठी गावागावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असल्याचे रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यां मागे पिकाला मिळणारा कमी भाव आणि खतांच्या वाढत्या किमती आहेत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ऑरेंज सिटी आणि रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया ने गावापर्यंत आणि कमी खर्चात चांगली शेती चांगलं उत्पादन घेता येतील, या साठी उत्पादने विकसित केले आहेत. हे उत्पादन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थे मार्फत चालवण्यात आलेल्या गावा गावातील घराघरात ओरगॅनीक शेती या चळवळीतून पोहचवणार आहेत. यातून उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांचीही एक साखळी तयार करण्यात येणार आहे. यावेळी ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. चे डॉ. संजय देशमुख, यशपाल पुणेकर