शासकीय आशादिप महिला वसतिगृहामध्ये मुलीला मारहाण : घटना CCTV मध्ये कैद..

जळगाव – शासकीय आशादिप महिला वसतिगृह जळगाव येथे गेल्या काही महिन्यापासून विविध कारणाने नेहमीच चर्चेत येत असून आता पुन्हा एकदा एका मतीमंद मुलीला सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास वसतिगृहातील मुलीनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने उघड झाली आहे. यावर आता चौकशी समिती नेमली गेली असून या घटनेची सखोल माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृह येथे दि.४ जुलै 2025 रोजी सकाळी एका ३२ वर्षीय मतीमंद मुलीला याच वसतिगृहातील मुलींनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिला पोलिस कर्मचारी यांनी अधीक्षक यांच्यासह जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांच्याकडे ही तक्रार दि. १० रोजी आली असता त्यांनी तत्काळ यावर चौकशी समिती नेमली व सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आहे. मात्र या वसतीगृहातील महिला अधीक्षकांनी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कुठलीही तक्रार अथवा माहिती दिली नसल्याचे जिल्हा महिला बालविकास अधिकारी तडवी यांनी सांगितले. दि.११ रोजी अधिकाऱ्यांनी या वसतीगृहाची पाहणी करून चौकशी सुरु असल्याचे सांगितले.