यावल

वर्तमान व्यवस्थेवर कवीचा हल्ला बोल अन् गरिबीचे वास्तव…

यावल दि.८ ( सुरेश पाटील )- रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज..देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही.प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म.. निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य ठरले नाही…छत्रपती संभाजीनगर येथील विद्रोही कवयित्री डॉ.प्रा.प्रतिभा अहिरे यांच्या अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी मराठी,हिंदी,उर्दू त्रैभाषिक कविसंमेलनात देशाच्या वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल केला,तर आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तवही उभे केले.निमित्त होते लोकशाही उत्सव समितीच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृहात निमंत्रित कवि संमेलनाचे कवितांतून

लोकशाही उत्सव समितीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २५ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन केले होते.या कविसंमेलनात देशाच्या सद्य स्थितीसह मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उमटले.डॉ.कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन झाले.सुरूर यांनी आओ हिंदुस्तान बनाये ऐसा हिंदुस्तान प्यार का हो कानून जहाँ और सबका हो सन्मान…

लोकशाही उत्सव समितीच्या त्रैभाषिक कवि संमेलनाला उपस्थित प्रा.प्रतिभा अहिरे (छ.संभाजीनगर),कमर सुरूर (ख्यातनाम आंतर राष्ट्रिर शायर, अहिल्यानगर ),मुसेब आझमी (अझिमगड उत्तर प्रदेश ), नोमान सिद्दीकी(गोरखपुर, उत्तर प्रदेश ) सुनिल उबाळे ( छ.संभाजीनगर ) जेष्ठ शायर बिलालअहेमदनगरी ( अहिल्यानगर )आदी.इसानो में फैल रहा है नफरत का आजार दिन धर्म में बाँट रहे हो उलफत का संसार.. दिल का शीशा टूट गया तो रोयेगा भगवान ही कविता सादर केली.छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तव उभं केलं… ‘ लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं ताळेबंद तिजोरीत.. म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी…ती भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली, मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडतात….. या कवितेला उपस्थितांनी मोठी दाद दिली.ज्येष्ठ शायर बिलाल अहेमदनगरी यांनी युवकांच्या विसंगतीवर मार्मिक शब्दांत भाष्य केले व काही प्रेमावरील शेर पेश केले. ‘मतला मेरी गझल का सुनया गया मुझे एक शायरे मिजाज बनाया गया मुझे.. मायूस तो नही हुं नमकीने जिंदगी से हर गम को सह रहा हूं अपनी हंसी खुशी से…प्रेम कवितांना मोठी दाद

आझमगड येथील शायर मुसेब आझमी यांनी प्रेम भावनेचे रंग भरले.. ‘आखिरत इंसाफ आशिक का करेगी जब पहेले मजनू से बुलाया जाएगा मुझको… हमसे जिंदा है जहाँ में उलफत.. तुझको दुनिया बताए कैसे..? हैरगी, आँख जो दिल के केंद्र… उसको पानी से बुझाए कैसे…?’ या तरलतम भावनेच्या कवितेलाही रसिकांनी दाद दिली. गोरखपूर येथील शायर नोमान सिद्दिकी यांनी याच आशयाला विस्तारत आपली गझल सादर केली.. ‘कुछ दिनों से है सुरज कही लापता चांद भी अपने घर से निकलता नही… सिर्फ बातो से अब दिल बहलता नही एक चिंगारी तो लाजमी है हुजूर कोई दीपक यहाँ खुद जलता नहीं…. याप्रेम कवितेलाही मोठी दाद मिळाली..

प्रास्तविक अशोक सब्बन यांनी,तर सुत्रसंचालन डॉ.महेबुब सय्यद यांनी,तर आभार सोनाली देवढे-शिंदे यांनी मानले.यावेळी कॉम्रेड स्मिता पानसरे, ॲड.बन्सी सातपुते,चित्रकार राजानंद सुरडकर,ॲड.रवींद्र शितोळे,संजय झिंजे,उपप्राचार्य जयदीप पवार,आनंद पुरंदरे,डाॅ.प्रशांत शिंदे,पत्रकार आबेदखान दुलेखान,संध्या मेंढे,रवी सातपुते,बिरबहादूर प्रजापती,आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे