बोरावल दरवाजाचे सुशोभीकरण करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवून नामकरण करण्याची मागणी..
यावल दि.८ ( सुरेश पाटील ) – यावल येथील ऐतिहासिक बोरावल दरवाज्याचे सुशोभीकरण करून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्याची मागणी तसेच जवळच असलेल्या शिवस्मारक शिवतीर्थ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याची मागणी
यावल शहरातील तरुण पदाधिकारी शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी केली आहे.यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.२७ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शहरात बोरावल गेट भागात शिवतीर्थ हे शिवस्मारक आहे. त्याशिवस्मारकाचे रूपांतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात करण्यात यावे अशी यावल शहरातील समस्त शिवप्रेमींची इच्छा आहे.या ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्यास त्या भागाच्या विकासात भर पडेल.सध्या प्रत्येक गावात शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. फक्त यावल शहर यास अपवाद आहे.तरी आपण शहरातील समस्त शिवप्रेमींच्या भावना लक्षात घेता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याची कार्यवाही करून कायदेशीर परवानगी द्यावी,तसेच यावल शहरातील बोरावल दरवाजा हि पुरातन ऐतिहासीक वास्तु अतिप्राचिन असुन लक्षवेधी आहे. सदर वास्तु ही काही अपवाद वगळता सुस्थीतीत आहे.तरी आजपावेतो या वास्तुला बोरावल दरवाजा या नावानेच ओळखले जाते.तरी या भागात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवतीर्थ या नावाने शिवस्मारक पण आहे. त्या अनुशंगाने सदर वास्तुचे सुशोभीकरण करून त्यास श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नाव देण्यात यावे अशी यावल शहरातील ९० % नागरिकांचे मागणी असल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति नागरिकांच्या व समाजाच्या मना मनात असलेल्या प्रेरणायुक्त, आदरयुक्त भावनांचा विचार करून लवकरात लवकर परवानगी द्यावी अशी विनंती शिवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर सुरेश माळी, उपाध्यक्ष नरेंद्र नथू शिंदे, सचिव सागर कृष्णा लोहार यांच्यासह भूषण खैरे,भरत बारेला,तुषार माळी,लोकेश चौधरी,सुमित पवार, विजय कोळी,समीर तडवी,राकेश चौधरी,चेतन बाळू बारी, सागर शिवाजी कोळी,भरत भोई,जालीम पटेल,निलेश चौधरी,घनश्याम पाटील,कुंदन पवार,नंदू कदम, तन्मय बोंडे, सोज्वल चौधरी, अविनाश भिल,सागर महाजन, दिलीप पाटील,खुशाल पाटील, कुणाल चव्हाण,जगदीश कोळी, धनंजय लोहार, संजय बारजिभे, हितेश तायडे,सुधाकर कुरकुरे, विशाल कोळी,गोपाळ चौधरी, योगेश पवार, हेमंत कोळी,ओम चव्हाण,यश येवले,महेश डाके देवेंद्र वाघ योगेश सपकाळे मयूर धनगर, मयूर यादव,यश कोलते,निखिल माळी इत्यादी शिवप्रेमी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.