
पारोळा – शेवगे बुद्रुक येथील तलाठ्यास ६ हजारांची लाच घेतांना जळगाव लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून महेशकुमार भाईदास सोनावणे असे तलाठ्याचे नाव असून सदर तलाठी यास लाच घेतांना रंगेहाथ पकडल्याने लाच खोरांच्या गोठ्यात एकच खडबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार व त्यांचे भाऊ यांच्या शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील N. A. झालेल्या शेतातील 9 प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येक नोंद घेण्यासाठी 1130 प्रमाणे एकूण 9 नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात 10,170 रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती 6000 रुपयाची लाच पंचासमक्ष स्विकारली म्हणून त्यांचे विरुध्द पारोळा पोलीस स्टेशन, येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल प्रकिया चालू होती.
सदर कारवाई
जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे,पो.हे.कॉ./किशोर महाजन,पोकॉ/ राकेश दुसाणे, पोकॉ/ पोळ यांनी केली.
ईतर महत्वाच्या बातम्या
वनकोठे गावाजवळ 19 किलो गांज्या जप्त : कासोदा पोलिसांची कारवाई..