यावल महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा..
यावल -जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न झाला.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या वक्त्या सौ.हर्षदा पवार ( प्रसिद्ध व्यावसायिक यावल) यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांमध्ये काम करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्याने महिला रोजगाराच्या संधी स्वतः शोधून सक्षम जीवन जगण्याची क्षमता आजही निर्माण करू शकतात घरची जबाबदारी सांभाळून येणारे प्रसंग, अडीअडचणीला आजही तोंड देत आहेत वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात पारंगत आहेत असे म्हणत पवार यांनी साडी सेंटर, ब्युटी पार्लर इतर उद्योग व्यवसायातील काम करून रोजगार मिळू शकतात असे सांगितले. उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले महिलांचे कार्य समाज बदलाचे माध्यम आहे. घरात संस्कार करण्याचे काम प्रथम आई करते. सहनशीलता हा स्री जीवनातील महत्त्वाचा गुण असून प्रेमळ, दयाळू, करुणा ममता, मातृत्व हे स्री जीवनातील आदर्शाचे गुण आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी छ.शिवाजी महाराज, राजाराम मोहन रॉय, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे असे सांगितले. तसेच प्रा. मनोज पाटील. प्रा. नरेंद्र पाटील आणी प्रा. सोनाली पाटील यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. परंतु काही ठिकाणी आजही महिला सुरक्षित नाही त्यासाठी महिलांनी अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला, महिलांवरील अन्याय अत्याचार पिळवणूक हे थांबले पाहिजे, कोणत्याही कामात आळस न करता सतत धडपडत राहणे आणि यश संपादन करणे ह्यात महिला आजही पुढे आहेत, वेळेचे नियोजन, व्यक्तिमत्व विकास आणि कामातील सतर्कता हे चांगले गुण अंगीकृत करून विद्यार्थिनींनी यश संपादन केले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले तर आभार डॉ. वैशाली कोष्टी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ.आर डी पवार, डॉ. संतोष जाधव, डॉ. मयुर सोनवणे,प्रा.सुभाष कामडी, डॉ निर्मला पवार, प्रा हेमंत पाटील, प्रा. सी टी वसावे, प्रा. हेमंत पाटील, प्रा. रूपाली शिरसाठ, प्रा. अश्विनी कोल्हे प्रा. संजीव कदम प्रा. चिंतामण पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होत्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.