यावल
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रशांत चौधरी यांचे अभिनंदन..
यावल दि.९ (सुरेश पाटील)- जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीकरीता घेण्यात आलेल्या निवडणूकीत जिल्हास्तरीय असलेल्या वैयक्तिक सभासद मतदार संघातून यावल तालुक्यातील सांगवी येथील तथा जिल्हा बँकेचे माजी संचालक, यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक प्रशांत लीलाधर चौधरी.यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील व सरकारी वकील उज्वल निकम यांनी प्रशांत चौधरी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.