यावल पोलीस स्टेशन हद्दीत प्रार्थना स्थळावर भोंग्यांसाठी परवानगी बंधनकारक : पोलीस निरीक्षक यावल पोलीस स्टेशन
यावल दि.१९ ( सुरेश पाटील ) – प्रार्थना स्थळांवर बसवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर भोंग्यांविरुद्ध शासनाने आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याने तसेच कारवाई नाही केली तर अधिकाऱ्यांना होणार शिक्षा असा सज्जड दम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने यावल पोलीस स्टेशनला आज धार्मिक स्थळ प्रमुख यांची बैठक घेण्यात आली आणि त्यात यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी उपस्थितांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
धार्मिक स्थळ प्रमुख यांच्या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी महत्त्वाच्या सूचना देताना सांगितले की महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३६ प्रमाणे धार्मिक स्थळावर भोंग्याची,लाऊड स्पीकरची परवानगी देण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.त्यामुळे प्रत्येक धार्मिक स्थळ प्रमुखांनी कायद्याच्या कक्षेत राहून ज्यांनी परवानगी काढली आहे त्या परवानगीचे नूतनीकरण करून अटी शर्तीनुसार, तसेच सायलेंट झोन,व इतर वेळेस स्पीकर लाऊड स्पीकर किती डेसिबल आवाजात पाहिजे इत्यादी बाबत माहिती दिली.तसेच ज्यांनी लाऊड स्पीकरची भोंग्याची परवानगी घेतली नाही त्यांनी रीतसर परवानगी घ्यावी.
पोलीस निरीक्षकांनी प्रत्येक प्रार्थना स्थळाला भेट द्यावी आणि तेथे भोंगा वाजविण्याची परवानगी घेतली आहे की नाही ते तपासून प्रत्येक पोलीस ठाण्यात डेसिबल मीटर बसविण्यात आला आहे किंवा कसे आणि त्यांनी भोंग्याचा, स्पीकरचा आवाज मोजला पाहिजे आणि जर आवाज मर्यादेपेक्षा जास्त असेल तर पहिले पाऊल म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवणे आणि कारवाई करणे परंतु जर पोलीस निरीक्षकाने कारवाई नाही केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे शासनाचे आदेश आहेत म्हणून यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळ प्रमुखांनी अटी शर्तीचे पालन करायला पाहिजे अशा महत्त्वाच्या सूचना आजच्या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिल्या.