यावल ग्रामीण रुग्णालय बंद असलेले पंखे तात्काळ सुरू करा – रा.युवक काँ.तर्फे भूषण नेमाडे यांची मागणी..
यावल दि.१९ ( सुरेश पाटील ) – येथील ग्रामीण रुग्णालयातील बंद असलेले पंखे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका संघटक भूषण नेमाडे यांनी केली आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात दररोज अनेक रुग्ण औषधोपचार घेण्यासाठी येत असतात काही रुग्ण विविध कारणास्तव ऍडमिट होऊन औषधोपचार,प्रथम उपचार घेण्यासाठी दाखल असतात उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे परंतु रुग्णालयात अनेक पंखे बंद स्थितीत आहे त्यामुळे औषधोपचार घेण्यासाठी व दाखल असलेल्या रुग्णांना उष्ण वातावरणाचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे बंद असलेले पंखे तात्काळ सुरू करण्याची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका संघटक भूषण नेमाडे यांनी केली आहे, पंखे तात्काळ सुरू न झाल्यास पुढील आंदोलनाची कारवाई करण्यात येईल असे सुद्धा भूषण नेमाडे यांनी म्हटले आहे.