जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन CEO श्रीमती मिनल करणवाल यांनी स्वीकारला पदभार..
जळगाव -श्रीमती मिनल करणवाल यांनी स्वीकारला पदभार.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांची बदली झाली असून श्रीमती करणवाल यांनी गुरुवार दिनांक 20 मार्च रोजी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आरडी लोखंडे, यांचे सह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांपूर्वी शासनाने जारी केलेल्या आदेशाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांचे संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद या पदावर बदली करण्यात आले होते तर त्यांच्या जागी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमती करणवाल यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच सर्व विभाग प्रमुखांचे चर्चा करून माहिती जाणून घेतली. तसेच पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेटी देऊन त्यांनी पाहणी केले. यावेळी शिक्षण, स्वच्छता, आरोग्य तसेच जल जीवन मिशन सारख्या विविध योजनांवर भर देणार असल्या संदर्भात त्यांनी माहिती दिली.