जिजाऊ ब्रिगेड,अमळनेर तालुकाध्यक्षपदी शिवमती वैशाली शेवाळे यांची निवड..
अमळनेर ( प्रतिनिधी) – मराठा सेवा संघ अमळनेर च्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अमळनेर येथील रथयात्रा नियोजन बाबत चर्चा .जिजाऊ ब्रिगेडची नुतन कार्यकारिणी निवड करणे. मराठा सेवा संघ तालुका कार्यकारिणीचा विस्तार करणे. मराठा सेवा संघ शहर कार्यकारिणीचा विस्तार करणे. क्रांती पर्व स्मारक समिती गठीत करणे बाबत चर्चा झाली.यात विशेषतः जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष पदी शिवमती वैशाली शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली.सचिव नुतन पाटील, कार्याध्यक्ष रेखा पाटील, उपाध्यक्ष सुरेखा खैरनार, उपाध्यक्ष सिमा पाटील,कोषाध्यक्ष पुनम ठाकरे. यांची नियुक्ती करण्यात आली. आणि आजच्या बैठकीत आदरणीय प्रा.अशोक पवार सर यांचा लोकमत शिलेदार सन्मान मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकारिणी चे सर्व स्तरावर स्वागत करण्यात आले.आणि राष्ट्रमाता,राजमाता, जिजाऊ साहेब यांच्या रथयात्रेचे यशस्वी नियोजन मराठा सेवा संघ अमळनेर करेल हि सर्वानुमते जबाबदारी घेण्यात आली.
सदर बैठकीत मराठा सेवा संघाचे प्रा.डॉ. लिलाधर पाटील, प्रा.डॉ. विलास पाटील, वसुंधरा ताई लांडगे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष निंबाजी पाटील कोषाध्यक्ष दयाराम पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, सचिव बापुराव ठाकरे, शहराध्यक्ष डॉ. कुणाल पवार, प्रेमराज पवार,डॉ. शरद शेवाळे,किरण पाटील, सरपंच महेश पाटील,पी.व्ही.पाटील,दिपक पाटील,प्रा.वंदना पाटील,रेखा पाटील, नुतन पाटील, सुरेखा खैरनार, सिमा पाटील, पुनम ठाकरे आणि, समाज बांधव उपस्थित होते. जिजाऊ ब्रिगेडच्या नुतन कार्यकारणीचा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील व मान्यवरांनी सत्कार केला व शुभेच्छा दिल्या .