2 हजार लाचेची मागणी : अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर ACB ची कारवाई..

अमळनेर – 2 हजार लाच मागणी प्रकरणी अमळनेर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यावर जळगाव एसीबी ने कारवाई केली असून मनोज साहेबराव निकुंभ, शिपाई, आस्थापना विभाग, नगर परिषद, अमळनेर असे त्याचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे नगरपरिषद अमळनेर येथे कार्यरत असून त्यांना १०,२०,३०प्रमाणे आश्वासित प्रगती योजनेचा दुसऱ्या हफ्त्याचा लाभ मंजूर झाला नव्हता, त्यासाठी ते नगरपरिषद अमळनेर कार्यालयातील शिपाई (आस्थापना व प्रशासन) मनोज निकुंभ यांना भेटून त्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चिती मंजूर करण्यासाठी काय प्रक्रिया असते याबाबत विचारपूस केली असता त्यांनी आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चितीचा दुसरा हप्त्याची आणि मुख्याधिकारी यांच्याकडून मंजूर करून आणून देण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच रक्कम मागणी केली, म्हणून तक्रारदार यांनी दिनांक 21/10/2024 यांचे विरुद्ध ला. प्र. वि. जळगाव यांच्याकडे लाच मागणी केल्याची तक्रार दिली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 21/10/2024 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता यातील मनोज साहेबराव निकुंभ, शिपाई, आस्थापना विभाग, नगर परिषद, अमळनेर यांनी तक्रारदार यांचे १०,२०,३० ची आश्वासित प्रगती योजना व वेतन निश्चिती फरकाची रक्कम मंजूर करून आणून देण्याच्या मोबदल्यात लोकसेवक निकुंभ यांनी 2000/- रू. ची लाचेची मागणी करून तक्रारदार हे शिपाई निकुंभ यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी गेले असता मनोज साहेबराव निकुंभ, शिपाई, यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाचेची रक्कम स्वीकारली नाही करीता साहेबराव निकुंभ, शिपाई, यांच्या विरूध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर साहेबराव निकुंभ, यांच्या विरूध्द यापुर्वी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये अमळनेर पोलीस स्टेशन येथे सन २०१९ मध्ये गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.
सदर कारवाई जळगाव एसीबी चे पोलीस उप अधिक्षक, योगेश ठाकुर,स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, पोना/बाळु मराठे, पोकों/प्रणेश ठाकुर यांनी केली