अत्यंत नित्कृष्ट कामाची चौकशी का होत नाही ? या कामाचा ठेकेदार कोण ? ठेकेदाराच्या डोक्यावर कुणाचा हात ? न्याय कोण देणार संतप्त सवाल..
धुळे (प्रतिनिधी).:-सुलवाडे जामफळ काणोली उपसा सिंचन योजना तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे कामाचे नाव उपनलिका क्र २ अंतरगत होत असलेल काम हे जिल्ह्यातील कुळथे गावाजवळ चालु असुन हे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत आहे कामाला जी शासनाने ठरवून दिलेली नियमावली ती अक्षरशा धाब्यावर बसवून हुकुमशाहीने काम होत आहे.जे पाईप लाईनीसाठी जाॅईन्ट मारले जात आहे ते पहील्याच प्रेशरने लिक होतील त्यात शेतकऱ्यांचच नुकसान होणार आहे.आणि त्या कामाबद्दल विचारणा केल्यावर शेतकऱ्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. तसेच दै राज्य बाळकडूचे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार यांनी इंजिनिअर यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी देखील माहीती न देता उडवा उडवीचे उत्तर दिले. अत्यंत चांगली योजना शेतकऱ्यांना एका प्रकारे संजिवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही शासनाने तर आपल काम शेतकऱ्यांच हित बघुन केल.परंतु स्वताचा स्वार्थ बघणारे आणि खिशे भरणारे ठेकेदार शासनाची व जनतेची दिशाभूल करुन फसवणूक करत आहेत. अश्या विक्षिप्त ठेकेदाराची चौकशी का होत नाही. अधिकारी काम बघुन कारवाई का करत नाही? याच नेमक कारण शोधन गरजेच आहे आज जर यांच्या कडे लक्ष दिल नाही तर पुढे नक्कीच अनर्थ होणार हे म्हणणे वावगे ठरणार नाही. ह्या कामाचे इंजिनिअर पाटील यांना वारंवार फोन करून ते फोन उचलत नाही माहीती देत नाही याचा अर्थ. ह्या ठेकेदाराच्या डोक्यावर नक्कीच मोठा अधिकारी किंवा मंत्र्यांचा हात असेलच हे मात्र नक्की.
जर ह्या ह्या कामीची पुढील दोन दिवसात चौकशी झाली नाही व शेतकऱ्यांना धमक्या देणा-यांनवर कारवाई झाली नाही तर पत्रकार परिषद घेतल्या शिवाय पर्याय राहणार नाही.आणि जर येवढं करूनही कारवाई किंवा चौकशी होत नसेल तर मग शेवटी उपोषण करणे हा एक पर्याय.तसेच सदर कामाची माहिती व त्या कामाबद्दल प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. तरी प्रशासनाला विनंती आहे की या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकुन चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराकडून काम करावे ही विनंती