“अहिराणी साहित्य भूषण” पुरस्कारासह “अहिराणी गौरव” पुरस्कारांचे मानकरी जाहीर
अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनात होणार वितरण..
अमळनेर – छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथिल अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरीत ३० व ३१ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात गौरविण्यात येणारे
अहिराणी साहित्य भूषण व अहिराणी गौरव पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात अहिराणी भाषेला सन्मान मिळवून देणारे व अहिराणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक कृष्णा पाटील यांना “अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी कार्य करणारे युवक व कलाकार यांना “अहिराणी गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले जाणार आहे.अहिराणी भाषेत रिल्स तयार करून विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत अहिराणी भाषा पोहोचवणाऱ्या सुप्रसिद्ध निकिता पाटील , रिलस्टार अशोक पाटील, खानदेशी फॉरेनर नावाने रील तयार करणारे अरुण सोनार, रिलस्टार दिपक खंडाळे ,अहिराणी आप्पा नावाने रील तयार करणारे कैलास चव्हाण रिलस्टार धनंजय चित्ते आणि रीयाताई चित्ते यांना गौरविण्यात येणार आहे.
अहिराणी चित्रपट व गाणी तयार करणारे अहिराणी नायिका पुष्पा ठाकूर, वनमाला बागुल, तोंडाय आक्का नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्या भाटिया, इंदिरा नेरकर तसेच सुप्रसिद्ध अहिराणी चित्रपटातील कलाकार अल्ताफ शेख, विजय पवार, अरुण जाधव यांचेसह अहिराणी गीतकार गडबड आहिरे, निर्माता दिग्दर्शक ईश्वर माळी, समाधान बेलदार, विजय जगताप, विठ्ठल चौधरी गीतकार जयराम मोरे, गौतम शिरसाठ आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
झुमका वाली पोर नावाने प्रसिद्ध असलेले राणी कुमावत विनोद कुमावत यांनाहि पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
अमळनेर हे अहिराणीचे मुख्य गाव मानले जाते. या भूमीतील दिग्दर्शक, अभिनेते संतोष पाटील अहिराणी भाषेतून गाणी आणि कीर्तन करणारे डॉ. दत्ता ठाकरे इन्स्टाग्रामवर वर रील बनवणारे रील स्टार गोल्डन पाटील, रवी बॉडीगार्ड, पिके नावाने प्रसिद्ध असलेला ओम भोई, वसंतराव पाटील यांना देखील याप्रसंगी अहिराणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. अहिराणी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह तयार करणारे किरण बागुल, जळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अहिराणी भाषेचा अभ्यासक्रम तयार करण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रा.डॉ. फुला बागुल व कवी प्रभाकर शेळके यांचा विशेष सत्कार सन्मान चिन्ह देऊन याप्रसंगी केला जाणार आहे असे अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील,स्वागताध्यक्ष प्रा. डी . डी . पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे,उपाध्यक्ष डी . ए. पाटील,साहित्यिक समन्वयक डॉ.कुणाल पवार,महिला समन्वयक वसुंधरा लांडगे, सचिव रामेश्वर भदाणे आदींनी जाहीर केले आहे.