पैसा आणि प्रतिष्ठेच्या लालचेने १० ते १२ लाख जनतेच्या आरोग्याशी खेळणार का.?ललितकुमार चौधरी.
जिल्हाधिकारी जळगाव,महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ यांना एक महिन्याच्या आत अहवाल सादर करायचे आदेश.
यावल दि.१ ( सुरेश पाटील )- वाघुर धरणातील बुडीत क्षेत्रात पाण्याच्या मधोमध महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ ह्यांचे उपलब्ध निधीने मौजे गारखेडा शिंगायात शिवार ता.जामनेर जिल्हा जळगाव येथे नव्यानेच पर्यटन विकास लग्न मंडप,रिसोर्ट,निवासी तंबू,झोपडी हॉटेल्स,पंचतारांकित कार्यक्रमाचे आयोजनास सुसज्ज असे दालन ई.पक्क्या स्वरुपाची २५-४० कोटीची बांधकामे गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरु आहेत.व त्यांचा व्यावसायिक वापर देखील सुरु असल्याने या उद्योगामुळे त्या ठिकाणी,म्हणजे वाघुर धरणात जाणारे वापराचे घाण दूषित अशुद्ध पाणी जनतेला मिळणार असल्याने यात अंदाजे १० ते १२ लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणार आहेत का.? अशी लेखी तक्रार ललितकुमार चौधरी यांनी संबंधित विभागाकडे आणि जिल्हाधिकारी जळगाव तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ,मुख्य प्रधान वनसंरक्षक यांच्याकडे दिली आहे.
सदरची तक्रार राष्ट्रीय हरित लवाद खंडपीठ पुणे यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याने जिल्हाधिकारी जळगाव, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, मुख्य प्रधान वनरक्षक नागपूर यांनी एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश झाले.अशी माहिती ललित चौधरी यांनी दिली.