यावल येथील पांडुरंग सराफनगर मध्ये नवीन ढापा करणेची मागणी केली शिवसेनेने..
यावल दि.१ (सुरेश पाटील) येथील पांडुरंग सराफनगर फैजपूर रोड येथील रस्त्यावरील ढापा नवीन करणे बाबतची मागणी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे.
दि.१ एप्रिल २०२५ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल येथील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर मधील मुख्य प्रवेश रस्त्यावर अनेक वर्षापासून ढापा तुटला आहे. त्या रस्त्यावरून मोठी वर्दळ सुरू असते दुचाकी चार चाकी जाणारी येणारी वाहने,पायदळ चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अनेक वेळा या ठिकाणी किरकोळ अपघात होऊन अनेक जण जखमी झालेले आहेत याबाबत नगर परिषदेकडे तोंडी सूचना करून देखील ढाप्याची दुरुस्ती झालेली नाही.तरी या
ढाप्याची तात्काळ दुरुस्ती किंवा नवीन मजबूत असा ढापा तात्काळ करावा अन्यथा या परिसरातील नागरिक व शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख संतोष धोबी,तालुका उपप्रमुख शरद कोळी,शहर उपप्रमुख योगेश चौधरी,शहर उपप्रमुख योगेश राजपूत,आदिवासी सेना तालुकाप्रमुख हुसेन तडवी,शहर उपप्रमुख निलेश पाराशर यांनी केली आहे.